मुंबईतील रुग्णसंख्या घटतेय; २४ तासांत आढळले फक्त इतके रुग्ण

 

मुंबई | ओमिक्रॉनच्या संसर्गानंतर मुंबईत अचानक कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला होता. काही दिवस दैनंदिन २० हजारांच्या आसपास रुग्ण आढळून आल्यानं मुंबईकरांच्या चिंता वाढली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख खाली येताना दिसत आहे.

मात्र आता मुंबईतून दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत मुंबईत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. गेल्या मुंबईत २४ तासांत ६ हजार १४९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ हजार ८१० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

आज तागायत मुंबईतील बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९४,८,७४४ वर पोहोचली. मुंबईचा रिकव्हरी रेट ९४ टक्के इतका आहे. सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या ४४,०८४ इतकी असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी ६१ दिवस आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट १.१० टक्के इतका आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहेत. १५ जानेवारी रोजी मुंबईत १०,६६१ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर १६ जानेवारी रोजी मोठी घट होऊन ७ हजार ८९५ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली, तरी दुसरीकडे चाचण्यांमध्येही मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे.

Team Global News Marathi: