SRA घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, किरीट सोमय्यांनी केला हा दावा

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत सापडल्या आहेत. शुक्रवारी दादर पोलीस स्थानकात किशोरी पेडणेकर यांची 15 मिनिटं चौकशी झाली आहे.आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर दादर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून एसआरए घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली. आज पुन्हा किशोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी दादर पोलिस ठाणे येथे करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले होते.

एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीत जून महिन्यात दादार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यांची चौकशी करण्यात आली.या व्यक्तींनी पोलीस चौकशीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं नाव घेतलं आहे. याचप्रकरणी शुक्रवारी त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. यावेळी त्यांची 15 मिनिटं चौकशी झाली असून आज त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलंय.

दादर पोलीस स्टेशन १२ एसआरए फ्लॅट्सच्या फसव्या विक्री, किश कॉर्पोरेट कंपनी विरुद्ध मरीन लाईन्स पोलीस स्टेशनची चौकशी सुरू आहे. वरळी 6 SRA फ्लॅटच्या बेकायदेशीर ताबा , किश कॉर्पोरेटला बीएमसी कोविड कॉन्ट्रॅक्ट, माझी हायकोर्टात याचिका दाखल’ अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केली आहे.

Team Global News Marathi: