आध्यात्मिक गुरू रघुनाथ येमुल यांना अटक, महिलेच्या छळप्रकरणी सहभागी असल्याचा ठपका

 

आजची उछशिक्षित पिढी अंधश्रेद्धेला बाली पडून अनं प्रकार आपल्या प्रगतीसाठी करताना दिसून आले आहेत. त्यातच सुनेला सिगारेटचे चटके देऊन बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण करणाऱ्या उद्योजक पती व कुटुंबातील तिघांसह आठ जणांविरुद्ध यापूर्वी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी आता याप्रकरणी उच्चभ्रू आध्यात्मिक गुरूंना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली.

रघुनाथ राजाराम येमुल असे अटक केलेल्या गुरुजींचे नाव आहे. याबाबत २७ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही घटना जानेवारी २०१७ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे. या प्रकरणात पती गणेश नानासाहेब गायकवाड यांच्यासह सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांना अटकपूर्व जामीन झाला असून, पती गणेश आणि राजू अंकुश हे फरार झाले आहेत.

रघुनाथ येमुल गुरुजी यांनी फिर्यादी महिलेचे पती गणेश गायकवाड यांना ‘तुझी बायको पांढऱ्या पायगुणांची आहे. तिची जन्मवेळ चुकीची आहे, त्यामुळे ग्रहमान दूषित झाले आहेत. जर ही बायको म्हणून कायम राहिली तर तू आमदार होणार नाही, मंत्री होणार नाहीस. त्यामुळे तिला लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे. मी दिलेला लिंबू उतरविल्यावर तुझ्या मागची पीडा कायमची निघून जाईल.’ त्यानंतर पती गणेश यांनी बायकोवरून लिंबू ओवाळून टाकले होते.

तसेच संसार मोडण्यासाठी अनिष्ट रुढी-परंपरा, अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे पुरवणी जबाबात फिर्यादी महिलेने नमूद केले आहे. गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर येमुल गुरुजींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: