‘आजोबाच्या वयात तिसरी पत्नी शोधतोय, हा अंडी विकण्याच्या लायक’ भाजपा खासदाराचे अमीर संदर्भात वादग्रस्त वक्तव्य |

 

भोपाळ | अभिनेता अमित खान याने आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत घटस्पोट घेतला असून या संदर्भातील माहिती त्याने आपल्या सोशल मीडियाच्या यामाध्यमातून दिलेली आहे. मात्र त्यांच्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाचे खासदार सुधीर गुप्ता याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

देशातील वाढत्या लोकसंख्येच्या पाठीमागे अमीर खान सारख्या लोकांचा हात आहे. अमीर खान सारखे लोक भारताच्या लोकसंख्येचे संतुलन बिघडवतात. जागतिक लोकसंख्या दिना निमित्त पत्रकारांशी बोलताना मंदसौर मतदार संघातील भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांनी थेट अमीर खान यांच्यावर निशाण साधला आहे.

पुढे ते म्हटले की, दुर्दैव्याने आमिर खान देशातील लोकांसाठी हिरो आहे, त्याने रीना दत्तला सोडले, तिच्यापासून आमिरला दोन मुले आहेत, नंतर आमिरने किरण रावसोबत लग्न केले आणि तिच्यापासून एक मुल आहे. जेव्हा आजोबा बनण्याचे वय आहे, तेव्हा तो तिसरी पत्नी शोधतोय. एवढ्यावरच न थांबता सुधीर गुप्ताने म्हटले, असा संदेश एखादा हिरो देतो का. जगभरातील लोक म्हणतात की अंडी विकण्याशिवाय यांच्याकडे जास्त बुद्धी नाही, त्याने एवढे जरी केले तरी जास्त बरे आहे असे विधान त्यांनी केले आहे.

Team Global News Marathi: