केंद्राची लसीकरण मोहिमेसाठी खास जय्यत तयारी, वाचा काय दिले आहे आदेश

केंद्राची लसीकरण मोहिमेसाठी खास जय्यत तयारी, वाचा काय दिले आहे आदेश

केंद्राने लसीकरण मोहिमेसाठी खास तयारी केली आहे. दर दिवसाला शंभर ते दोनशे लोकांना लस टोचण्यात येणार आहे. लास टोचण्यात येणाऱ्या व्यक्तीला अर्धा ते एक तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे असा काही सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत.

राज्य सरकारला दिलेल्या निर्देशांनुसार को-विन या अॅपवर नोंदणी केलेल्यांनाच लसीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच सर्व राज्य सरकारने लसीकरणाची मोहीम परिणामकारक राबवण्यासाठी जनजागृती करावी असेही निर्देश देण्यात आलेले आहे. तसेचच लसीची वःतून आणि वापराबाबत काही निर्देश केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत.

सर्व प्रथम कोरोना योद्धे आणि ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येतील असंही या नियमावलीत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना लस देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण केंद्र राखून ठेवली जाणार आहे. त्यामुळे त्यांना लवकर लस मिळू शकेल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: