अमृता फडणवीस यांचं नवं गाणं येणार, त्या ट्रोलर्स ला म्हणाल्या की…..

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं येणार, त्या ट्रॉलर्सना म्हणाल्या की…..

ग्लोबल न्यूज: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत असतात. तर कधी आपल्या गाण्यावरून नेहमीच सोशल मीडियावर नेहमीच ट्रॉल होत असतात.

त्यात काही दिवसांपूर्वीच ‘तिला जगू द्या’ या गाण्यामुळे मिसेस फडणवीस चर्चेत आल्या होत्या. या गाण्याला त्यांना बऱ्याच टीकेचाही सामना करावा लागला होता. या गाण्यावर अक्षरशः डिसलाईक्सचा वर्षाव करण्यात आला होता. या गाण्याचा आशय चांगला असला तरी राजकीय विरोधाने ट्रोल केले जाते असे देखील त्या म्हणाल्या.

त्यात आता येत्या 17 डिसेंबरला त्यांचे नवं गाणं प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती खुद्द अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली आहे. ‘मुंबई तक’ या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मी कधी ट्रॉल होते तर कधी माझं कौतुक होत. हे माझ्या आयुष्यातील चढ-उतार आहे. मी लहानपणापासून गाणं शिकत आहे. त्यामुळे मला माझ्या क्षमता माहित आहेत. जे ट्रोलिंग होत आहे ते राजकीय दृष्ट्या केलं जात आहे असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: