सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

 

मुंबई | सोमवारी भारतीय बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून आला. मात्र आज (31 जानेवारी रोजी) MCX वर सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे. MCX वर 5 एप्रिल 2023 रोजीच्या सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमतीमध्ये 41 रुपये किंवा 0.07 टक्क्यांची किरकोळ घसरण झाली. ज्यामुळे ते 57,162 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आले आहे.

त्याचप्रमाणे, MCX वर 3 मार्च 2023 रोजीच्या चांदीच्या फ्युचर्समध्ये 69 रुपयांची किंवा 0.10 टक्क्यांची घसरण झाली. ज्यामुळे ती 68,604 रुपये प्रति किलो वर आली आहे. काल जेव्हा बाजार बंद झाला तेव्हा सोने 57,047 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 68,589 रुपये प्रति किलो वर बंद झाली. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीचा दरात घसरण झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस $1,915.20 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस $ 23.49 वर प्रति औंस वर आहे.

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,270 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,270 रुपये

Team Global News Marathi: