सोनू सूदची बहीण उतरणार निवडणुकीच्या रिंगणात या राज्यातून लढवणार निवडणूक !

 

मुंबई | कोरोनाच्या काळात अनेक परप्रांतीय कामगारांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू सूद अवघ्या काही दिवसात चांगलाच प्रसिद्ध झाला होता तसेच त्याच्या या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विदेशातील अनेक वृत्तपत्रांनी घेतली होती. मात्र कालांतराने त्यांच्या कार्यालयावर तसेच घरावर आयकरने छापे टाकले होते. मात्र आता दुसरीकडे सोनू सूद याची बहीण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

एकीकडे देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक मदतीसाठी सैरावैरा भटकत होते, तर दुसरीकडे अशा लोकांसाठी अभिनेता सोनू सूद अगदी देवदूतासारखा लोकांच्या मदतीसाठी धावून येत आहे. यानंतर काही राजकीय पक्षांकडून सोनू सूदला निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती.

सोनू सूदने ही ऑफर नाकारली आहे. मात्र, आता त्याची बहीण मालविका सूद सच्चर पंजाबमध्ये निवडणूक लढवणार आहे. मात्र, मालविका कोणत्या पक्षातून, कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे अद्याप समोर आलेले नाही. सध्या पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून अनेक इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरु केली आहे,

Team Global News Marathi: