……तर इतर सर्व महामंडळातील कर्मचारीही विलीनीकरणाची मागणी करतील

 

मुंबई | परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागच्या दोन आठवड्यापासून आंदोलन करत असून या आंदोलनातुन अद्याप तोडगा निघालेला नाहीये. त्यातच याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार चिकलफेक सुद्धा केली आहे. अंतर अद्याप हा प्रश्न सुटलेला नाहीये. त्यातच आता एसटी विलीनीकरणाबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘एसटीचे विलीनीकरण केले तर इतर महामंडळातील कर्मचारीदेखील विलीनीकरणाचीच मागणी करतील, असं अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार यावेळी म्हणाले, ‘एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण केलं तर राज्यातील इतर महामंडळातील कर्मचारीही तीच मागणी करतील. अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, कोतवाल, पोलिस पाटील हे देखील विलीनीकरणाची मागणी करू शकतात’, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवरही निशाणा साधला.

यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा देणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनाही त्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. ‘गेल्या 60 वर्षात कधी एसटीचा सरकारमध्ये विलीनीकरणाचा मुद्दा समोर आला नव्हता. मात्र मुद्दाम हा प्रश्न चिघळवला जात आहे. राज्यातील विरोधी पक्ष मुद्दाम विविध मुद्दे काढून राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.’ अशी टीका त्यांनी केली आहे.

Team Global News Marathi: