सोनू सुदच्या घरी मदत मागणाऱ्यांच्या रांगा, नेटकरी म्हणतात हाच पंतप्रधान हवा

 

सध्या संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य तसेच केंद्र सरकारच्या चिंतेत भर घालताना दिसत आहे. अशातच मागच्या एप्रिल महिन्यापासून अभिनेता सोनू सूद परप्रांतीय कामगार, बेरोजगार अशा अनेकांच्या मदतीला धावून जाताना दिसत आहे.त्याच्या या कामाचे कौतुक देशभरात नाही तर विदेशातही झाले होते. अद्यापही त्याचा गरजूंना मदतीचा ओघ सुरूच आहे.

तसेच आता देशात सुरु असलेल्या कोरोनाच्या भयंकर महामारीत ऑक्सिजन आणि बेड्सचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे आहे. अशा स्थितीतही सोनू सूद व त्याची टीम गरजू रुग्णांना आॅक्सिजन पुरवण्याचे, बेड्स उपलब्ध करून देण्याचे काम करताना दिसत आहे. आता तर ऑक्सिजन व बेड्ससाठी वणवण भटकत असलेल्या कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांनी सोनू सूदच्या घरासमोर गर्दी करणे सुरू केले आहे.

सध्या मुंबईमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. तरीही लोक सोनू सुदच्या घराबाहेर रांगा लावून त्यांच्या भेटण्याची वाट पाहत आहे. तसेच सोनू सूद या लोकांना निराश न करता, त्यांच्या समस्या ऐकून घेत त्यांना मदतीचे आश्वासन दिले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही तासांत ७ लाखांवर लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सोनूवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी तर सोनूला पंतप्रधान करा, अशी मागणी केली आहे.

Team Global News Marathi: