सोनिया गांधींनी स्मृती इराणींना धमकावलं, निर्मला सीतारमण यांचा आरोप

 

नवी दिल्ली | काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या विधानामुळे संसदेतील वातावरण तापलं आहे. सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षातील काँग्रेसला या निमित्ताने पुन्हा एकदा घेरलं आहे. भाजप नेत्यांनी या निमित्ताने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला आहे की सोनिया गांधी यांनी स्मृती इराणी यांना धमकावलं.

सीतारमण म्हणाल्या की सोनिया गांधी या भाजपच्या खासदार रमा देवी यांच्याशी बोलत असताना तिथे स्मृती इराणी गेल्या होत्या. इराणी यांनी ‘काय झालं ?’ असं विचारलं असता सोनिया गांधी यांनी स्मृती इराणी यांना झिडकारून लावत ‘माझ्याशी बोलू नका’ असं सुनावलं होतं. सोनिया गांधी यांनी धमकावल्याच्या सुरात हे उद्गार काढले होते असा आरोप सीतारमण यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा आक्षेपार्ह केल्यामुळे लोकसभेत आज या मुद्दय़ावरून प्रचंड गदारोळ झाला. अधीर रंजन यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली. यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ‘डोण्ट टॉक टू मी’, असे सुनावतच सोनिया सभागृहाबाहेर पडल्या.

दरम्यान, राज्यसभेत खासदार निलंबित करण्याची मालिका आजही कायम राहिली. आज तीन खासदार आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले. लोकसभेत आज ‘राष्ट्रपत्नी’ हा मुद्दा गाजल्याने महागाई व जीएसटी हे विरोधकांचे मुद्दे अडगळीत पडले. अधीर रंजन यांनी वादग्रस्त विधान करून सेल्फगोल तर केलाच, शिवाय चुकून बोललो मग फाशी देता काय? असे उद्दाम उत्तर दिल्याने सत्ताधाऱयांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले. परिणामी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले.

अमित शाह आणि गिरीश महाजन यांच्यात खलबतं, ट्विट करून महाजनांनी दिली भेटीची माहिती !

” माझा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी आहे”

Team Global News Marathi: