सेन्सेक्स ६०३ अंकांनी वधारला, निफ्टीनं १७ हजार अंकांचा टप्पा ओलांडला

 

आज शेअर बाजारात सुरुवातीलाच उसळण पाहायला मिळाली आहे. बाजार सुरु होताच सेन्सेक्स आणि निफ्टीनं घोडदौड सुरु केल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 603 अंकांनी वधारला, तर निफ्टीनंही 187 अंकांनी उसळण घेती. निफ्टीनं 17 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. फेडच्या निर्णयानंतर आणि आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीआधी रुपया मजबूत स्थितीत आहे.3

तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया 79.53 वर उघडला आहे. रुपयात 23 पैशांनी अधिक वाढ होऊन मजबूत झाला आहे. रुपयामध्ये पतधोरण समितीच्या बैठकीआधी रिकव्हरी झालेली पाहायला मिळतेय. जागतिक बाजरातील चांगल्या रिकव्हरीनंतर भारतीय शेअर बाजारातही तेजी पाहायला मिळत आहे. आज सकाळी बाजार सुरु होताच सेन्सेक्सने 400 हून अधिक अंकांनी उसळी घेत 57,258.13 वर सुरुवात केली.

त्याचप्रमाणे निफ्टीही 49.90 अंकांनी वधारल्याचं पाहायला मिळालं. बाजार सुरु होताच 17,079.50 वर व्यवहार करत होता. कच्च्या तेलाच्या वाढत्या मागणीमुळे भाव 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक भारताकडून बाहेर काढण्याची स्थिती मंदावली आहे. अमेरीकेतील येणाऱ्या मंदीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे.

सोनिया गांधींनी स्मृती इराणींना धमकावलं, निर्मला सीतारमण यांचा आरोप

” माझा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी आहे”

Team Global News Marathi: