‘कोणी खुर्ची देत का खुर्ची अशी फडणवीसांची अवस्था’

 

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्धसुरु झाले असून संजय राऊत हे नटसम्राट आहेत अशी टीका फडणवीसांनी केल्यानंतर आता संजय राऊत यांनी देखील त्यांच्यावर पलटवार केला आहे. कोणी खुर्ची देत का खुर्ची अशी फडणवीसांची अवस्था आहे असं राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांचा समाचार घेतला. नटसम्राट म्हणलं म्हणून आम्हाला वाईट वाटण्याचे कारण नाही पण त्याच नटसम्राट चित्रपटात एक वाक्य आहे कि कोणी मला घर देता का घर त्याचप्रमणे फडणवीसांची अवस्था कोणी मला खुर्ची देता का खुर्ची असा टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला.

संजय राऊत यांना नटसम्राटमध्ये भूमिका दिली पाहिजे. कारण ती भूमिका ते उत्तम वठवू शकतात. हे तेच संजय राऊत आहेत ज्यावेळी मनोहर पर्रीकर आजारी होते नाकामध्ये नळी असताना विधानसभेत बजेट मांडले, त्यावेळी याच संजय राऊत यांनी हे म्हटलं होते की, गोव्यातले ‘सरकारही सिक आणि मुख्यमंत्रीही सिक’ असे सरकार चालवणे किती अयोग्य आहे.

Team Global News Marathi: