काँग्रेसकडे इतका आत्मविश्वास येतो कुठून, संजय राऊतांनी लगावला टोला

 

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी साऱ्याच पक्षांनी जोरदार ताकद लावली आहे. भाजपमधून काही मंत्र्यांनी राजीनामा देत अन्य पक्षांची कास धरली आहे. तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने युती जाहीर केली आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युती जाहीर केली आहे.

या युतीमध्ये काँग्रेसला बरोबर घेण्याचे प्रयत्न सेना-राष्ट्रवादी पक्षाने केले होते मात्र यश आले नाहीये. त्यातच काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला होता. यावरून तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर टिका केली असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या दिलेल्या प्रतिक्रियेवेळी म्हटलं आहे की, ‘काँग्रेस तयार नाही. काँग्रेसला वाटत की त्यांनी स्वळावर बहुमत मिळेल. हा त्यांचा आत्मविश्वास आहे. मला माहित नाही की त्यांना इतका आत्मविश्वास येतो कुठून? शिवसेना आणि राष्ट्रवादीने युती केली आहे आणि आम्ही गोवा निवडणूक लढवणार आहोत.’

Team Global News Marathi: