” सोमय्यांनी खोटे आरोप करणे बंद करावे, माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा ठोकणार “

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारवर अनेक आरोप लावताना दिसून येत आहे त्यातच आता या आरोपांना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे भाजपचे किरीट सोमय्या हे खोटं बोलतात, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.

राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेची टक्केवारी सोमय्या यांनी डिबेटमध्ये जाहीर केली. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेपैकी ४० टक्के रक्कम शिवसेनेला मिळते. ४० टक्के रक्कम राष्ट्रवादीला मिळते, तर २० टक्के रक्कम काँग्रेसला मिळते, असा आरोप सोमय्या यांनी डिबेटमध्ये केल्याचं लोंढे यांनी सांगितलं.

सोमय्या यांनी हे आरोप करत असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नव्हते. सार्वजनिकरित्या असे खोटे आरोप करणं काँग्रेस खपवून घेणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली. सोमय्या नेहमीच खोटे आरोप करत असतात. त्यांनी केलेले खोटे आरोप रेक्रार्ड केले असून, याची तक्रार नागपूर पोलीस आयुक्तांक डे केली असल्याचं अतुल लोंढे म्हणालेत.

किरीट सोमय्या यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी बदनामे करणारे गुन्हे दाखल करण्याची मागणी लोंढे हे न्यायालयात करणार आहेत. काल टीव्ही डिबेटमध्ये किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर सुलीचा आरोप केला होता. केलेल्या आरोपाचे किरीट सोमय्या यांनी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी असेही लोंढे म्हणाले.

Team Global News Marathi: