पहिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या बेनामी प्रॉपर्टीची सोमय्या यांनी केली पाहणी

 

माजी मृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजीव पलांडे यांच्या, तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली आहे, असा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथे केला होता. तसेच दाखले सुद्धा तयानी दिले होते. याच पार्श्वभूमीर सोमय्या यांनी आज बजरंग खरमाटे यांनी बांधलेल्या आलिशान बंगल्याची पाहणी करण्यासाठी सांगलीत दाखल झाले होते.

यावेळी पहिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या फार्म हाऊसची पाहणी केली तसेच भाजपचे नेते मकरंद देशपाडे यांच्यासमवेत आले हाेते. सकाळी साडेदहा वाजता त्यांनी वंजारवाडीस भेट दिली.परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना इडीने समन्स बजावून चौकशीसाठी बाेलावले आहे. याबाबत सोमय्या म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे इडीच्या अधिकाऱ्यांकडे खरमाटे यांच्या ७५० कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेची माहिती आहे. त्याचीच चौकशी सुरु झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचेही काऊंटडाऊन सुरु झालेले आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, सांगली जिल्ह्यात चार ठिकाणी परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची बेनामी मालमत्ता आहे. एका ठिकाणी १५० एकर जमीन आहे. तर औद्योगिक वसाहतीमध्ये पाच एकर जागेवर एक कंपनी आहे. वंजारवाडी गावात अलिशान फार्म हाऊस आहे. या कोट्यवधी रुपयांच्या बेनामी संपत्तीची पाहणी करण्यासाठी आलो आहे.वंजारवाडी येथील फार्म हाऊसची किंमत २० ते २२ कोटी रुपये आहे.

 

Team Global News Marathi: