सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल, तर आम्हाला बेळगावात जागा द्या

 

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी काही गावांसाठी सोलापुरात हक्क सांगण्यास सुरवात केली म्हणून तुम्ही सोलापुरात कर्नाटक उभं करायचं म्हणत आहेत. मात्र सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या, असा उलट सवाल संजय राऊत यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना केला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत यांच्या आगपाखड केली. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्राचे प्रत्येक राज्याशी प्रेमाचे संबंध असून कर्नाटकाशी सुद्धा आहेत. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री काल परवा नवस फेडायला गेले होते. गुवाहाटीवरून येताना आसाममध्ये आसाम भवन उभ करण्याच ठरवलं. तर दुसरीकडे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, कोल्हापूरमध्ये कर्नाटक भवन उभं करणार असल्याचे सांगितले.

मुंबईमध्ये सुद्धा अनेक भवन आहेत. कानडी बांधवांचे अनेक हॉल्स, भवन आहेत. पण जर तुम्ही सीमा वादाच्या लढ्यात काही गावांवरती हक्क सांगताय म्हणून सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या. बेळगाव आणि बेंगलोरला महाराष्ट्र भवन बांधण्याची आमची इच्छा असून या ठिकाणी दोन भवन बांधण्यात येईल, त्या संदर्भात निर्णय व्हावा, मग आम्ही तुमचा विचार करू असे संजय राऊत कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांना सुनावले.

 

Team Global News Marathi: