संजय राऊत यांना भूगोल कळतो का?, चंद्रकांत पाटलांचे सीमावादावरुन टीकास्त्र

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा ३ तारखे ऐवजी ६ तारखेला केला जाणार आहे. यावरून पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या दौऱ्याची माहिती दिली तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेळगावमध्ये काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनी मला विनंती केली कि तुम्ही ६ तारखेला या. त्यामुळे तीन ऐवजी ६ तारखेला जाण्याचे ठरविण्यात आले. या दिवशी देखील खूप कार्यक्रम ठरले आहेत. सीमावासीयांना भेटण्याचे, हुतात्म्यांच्या घरी जाण्याचे असे अनेक कार्यक्रम आहेत. त्यातील एक कार्यक्रम मी आंबेडकरवाद्यांचा स्वीकारला आहे. तिथे गार्डनमध्ये आंबेडकरांचा खूप मोठा पुतळा आहे, तेथे पुष्पहार अर्पण करणार आहोत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.


चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आपल्या माध्यमातून कर्नाटक सरकारला हे सांगू इच्छितो कि, आम्ही संघर्ष करायला येणार नाही आहोत. आम्ही ८६५ गावातल्या मराठी भाषिकांना महाराष्ट्र सरकरकडून काय सोयी -सुविधा देऊ शकतो, यावर चर्चा करायला आणि त्यावर निर्णय घ्यालाय आम्ही तिथे येत आहोत असे पाटील म्हणाले. यामध्ये ८६५ गावांमधले मराठी भाषिक समाधानी होतील याचा तुम्हाला फायदाच होईल. त्यामुळे कर्नाटक सरकारमधले नागरिक आहेत त्यामुळे तुम्ही सुविधा द्याच पण ते मराठी भाषिक असल्यामुळे ८६५ गावांमधील मराठी भाषिकांना ते महाराष्ट्रातीलच नागरिक आहेत असे मानून आम्ही त्यांना सोयी – सुविधा देणार आहोत, चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

तुम्ही संघर्ष कशासाठी वाढवत आहात ? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. तुम्ही बंदी करून आम्ही थांबणारी माणसं नाही. त्यामुळे कोणत्याही धमक्या देऊ नका. त्यांना असं वाटत आहे कि आम्ही चिथावणी देण्यासाठी येत आहोत. तसे नसून आम्ही समन्वयाने, लोकांचे म्हणणे ऐकून त्या म्हणण्यावर महाराष्ट्र सरकारला आपली भूमिक बजावायला आम्ही जात आहोत.

१५ गावांना पाणी तलाव भरण्यासाठी मिळायला लागलं. आता मुद्दा राहतो ४५ गावांचा , त्यासाठी २००० कोटींची योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी मान्य केली. जानेवारी मध्ये टेंडर निघून वर्क ऑर्डर निघून कामाला सुरुवात होईल. हि योजना पूर्ण झाली तर या ४५ गावांचा देखील प्रश्न सुटेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले कि, संजय राऊत यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे कि, कर्नाटक मधून पाणी सोडलं, ते वाईट झालं कि चांगलं झालं? राऊत यांना भूगोल कळतो का? जत कुठे आहे?, हे चाललंय काय? रोज सकाळी उठून काहीही भाषणं करत राहायची. जर समजा आम्ही जाऊन ८६५ गावांना मराठी भाषिकांना काही सुविधा देणार आहोत, तर त्यांना काही ऑब्जेक्शन घ्यायच आहे का?, असा संतप्त सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Team Global News Marathi: