सोलापुरात राज्यपाल कोश्यारी यांच्या दौऱ्याला विरोधात, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनाद

 

स्वामी विवेकानंद केंद्राच्या कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सोलापूरच्या दौऱ्यावर येत असून, शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांसह एक हजार ६२ पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सदर कार्यक्रमाला कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अधिक खबरदारी घेतली आहे.

विवेकानंद केंद्र वेदांतिक ॲप्लीकेशन ऑफ योग अँड मॅनेजमेंट या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे शुक्रवारी सकाळी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. जुळे सोलापुरातील प्रणव नगरी बॉम्बे पार्क येथे कार्यक्रम होणार आहे.विमानतळापासून कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत पोलिसांचा चौक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. जागोजागी अधिकारी थांबले आहेत.दरम्यान, बंदोबस्तामध्ये पोलीस आयुक्त हरीश बैजल, तीन पोलीस उपायुक्त, चार पोलीस सहाय्यक पोलिस आयुक्त, १८ पोलीस निरीक्षक, ३० साहाय्यक पोलीस निरीक्षक, ४८ पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी असणार आहेत. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी यांचाही समावेश असणार आहे.

Team Global News Marathi: