सहापदरी बायपासमुळे दळणवळण सुलभतेसह विकासाला चालना मिळेल

 

राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी भंडारा बायपासमुळे रायपूर-बिलासपूर-कलकत्ता ही प्रमुख शहरे जोडल्या जातील. शंभर किलोमीटर प्रतीतास गतीमुळे वाहतूक, दळणवळण सुलभ होईल. परिणामी भंडाऱ्याच्या विकासाला या बायपासमुळे गती मिळेल, असे आश्वासक प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा बायपासमुळे वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल असा विश्वास व्यक्त केला. तर आमदार परिणय फुके यांनी नागपूर – तुमसर रस्ता व तुमसरवरून बायपास करून देण्याची मागणी केली. भंडारा बायपासच्या डिजीटल भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

उत्तम रस्त्यामुळे दळणवळण व पर्यायाने उद्योगवाढीला चालना मिळेल, असे सांगून गडकरी म्हणाले की, अंभोरा पुलाची पाहणी केली असता तेथे पर्यटकांना आकर्षित करणारे उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकसित करता येईल. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

Team Global News Marathi: