नवी दिल्ली | ट्विटरनं भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टीक हटवली आहे त्यामुळे एका नव्या चर्चेला उधाण आले आहे. याचच अर्थ असा की ट्विटरनं उपराष्ट्रपतींचे अकाउंट अनव्हेरिफाइड केलं होत. ट्विटरच्या का कारवाईमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत होता. मात्र आता ट्विटरने एक पाऊल मागे येत यावर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच झालेल्या कारवाई बद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
यावर स्पष्टीकरण देताना ट्विटरकडून सांगण्यात आले आहे की, बऱ्याच कालावधीपासून अकाऊंट लॉग इन न केल्यानं ब्लू टिक हटवल्याचं ट्विटरनं सांगितलं. चूक सुधारली जाईल, असं आश्वासन ट्विटरकडून देण्यात आलं. त्यानंतर थोड्याच वेळात नायडूंचं अकाऊंट व्हेरिफाईड करण्यात आलं आहे. त्यामुळे व्यंकय्या नायडूं यांच्या ट्विटरमुळे निर्माण झालेला वाद आता शमलेला आहे. मात्र ट्विटरच्या कारवाईवर भाजपच्या अनेक नेत्यांनी हल्ला चढवला होता.
‘व्यंकय्या नायडूंचं ट्विटर अकाऊंट जुलै २०२० पासून सक्रिय नव्हतं. माझ्या व्हेरिफिकेशन धोरणानुसार, अकाऊंट सक्रिय नसल्यास ब्लू टिक आणि व्हेरिफाईट स्टेटस काढलं जाऊ शकतं. मात्र आता ब्लू टिक परत देण्यात आलं आहे,’ असं स्पष्टीकरण ट्विटच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आलं आहे. उपराष्ट्रपतींसह संघाच्या नेत्यांच्या अकाऊंटला असलेली ब्लू टिक ट्विटरनं हटवल्यानंतर बऱ्याच जणांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
Account inactive since July 2020. As per our verification policy,Twitter may remove blue verified badge&verified status if account becomes inactive. Badge has been restored: Twitter spox on blue tick removal from Vice President of India M Venkaiah Naidu's personal Twitter handle pic.twitter.com/7WhpZP8OEN
— ANI (@ANI) June 5, 2021
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानंदेखील याबद्दल नाराजी व्यक्त केली. ब्लू टिक का हटवण्यात आलं यामागचं कारण स्पष्ट करा, असं सरकारनं ट्विटरला सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच सरकार आणि ट्विटरमध्ये टूलकिटवरून जुंपली. त्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान नियमांवरून संघर्ष झाला. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाच्या दिल्ली आणि गुरुग्रामधील कार्यालयांवर छापे टाकले.