.तर ही वेळ आलीच नसती’ रावसाहेब दानवे यांनी पुन्हा लगावला ठाकरे सरकारला टोला !

सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले असून विरोधकांनी याच मुद्द्याचं राजकारण करून महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात राज्य सरकारने आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या पारड्यात टाकला आहे. त्यावरून आता भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध होताना दिसत आहे. त्यातच आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

नारायण राणे समिती स्थापन केली आणि त्या आधारावर तुम्ही आरक्षण दिलं. त्या काळात केंद्र आणि राज्यातही तुमचं सरकार होतं. जर हा विषय केंद्राचा होता तर मग केंद्राला डावलून तुम्ही आरक्षण कसं दिलं?, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला आहे. आज राजकीय परिस्थिती बदलली तर तुम्ही केंद्राकडे बोट दाखवत आहात. त्यावेळी जर तुम्ही कायदेतज्ज्ञांकडून सल्ला घेतला असता तर ही वेळ आलीच नसती, असंही दानवे म्हणाले.

सगळे मुद्दे केंद्राकडे ढकलायचे, मग हे काय करतात. मुळात हे अनैसर्गिक सरकार आहे. हे अमर, अकबर,अँथनीचं सरकार आहे. राज्य सरकारमध्ये अंतर्गत कलह आहे, म्हणून हे आरक्षण देऊ शकत नाही. परंतु याचा फटका सामान्य लोकांना बसत आहे, असंही दानवे यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: