“इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल”

महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४० जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी १२ वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होऊन दुपारी ३.२० वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार आहे.

आता मुख्यमंत्र्यांच्या तीन तासाच्या दौऱ्यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या या धावत्या दौऱ्यावर टीका केली आहे. इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर लगावला आहे.

दरम्यान, डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना मुख्यंमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण आवाहन केले होते. ते म्हणाले होते की, राज्यात जिथे जिथे डोंगर उतारावर आणि डोंगराखाली वस्त्या आहेत. त्यांना आम्ही स्थलांतरीत करण्याचे काम सुरू केले आहे. कारण रस्ते खचत आहेत. काही ठिकाणी पूल गेलेले आहे. अशा ठिकाणी जे नागरिक राहत आहेत, तेथे राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करावं. जिथे धोका निर्माण होऊ शकतो. तिथून नागरिकांना स्थलांतरीत केलं जाईल.

Team Global News Marathi: