हुंडाबंदी अधिनियम अंतर्गत गुन्ह्याप्रकरणी त्वरित कारवाई करावी

 

पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन अंतर्गत जून, २०२१ रोजी दाखल FIR ०२९३ बाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन पत्र देऊन चौकशी केली व या प्रकरणी त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. या पत्राची एक प्रत पोलीस विशेष महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा (महिला विरोधी अत्याचार प्रतिबंध) यांना देखील देण्यात आली आहे.

यातील आरोपींविरुद्ध भादंवि ४९८, ३२३, ३२५, ४०६, ४२०, ५०६, ३४ व हुंडाबंदी अधिनियमाच्या कलम ३ अंतर्गत FIR क्रमांक ०२९३/२०२१ गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात मुख्य आरोपी व अन्य सात आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने यामध्ये कार्यवाही करणे आवश्यक आहे. या प्रकरणी कनिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपीला अटक करण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करावे.

आरोपींना जामीन मिळणार नाही याबाबत आवश्यक पुरावे गोळा करावेत आणि पुराव्यासहित प्रकरण न्यायालयात मांडले जाईल या दृष्टीने पाहावे, तसेच या प्रकरणात पोलीस अभियोक्ता यांनीही आरोपींच्या विरोधात आवश्यक पुरावे सादर करुन खंबीर भूमिका मांडावी. महिला विरोधी अत्याचार विभागामार्फत सुद्धा या प्रकरणांचे पर्यवेक्षण करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Team Global News Marathi: