स्मृती इराणींच्या मुलीच्या रेस्टॉरंटमध्ये बीफ? तर काँग्रेसने केली राजीनाम्याची मागणी

 

पुणे | भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात बेकायदेशीरपणे रेस्टॉरंट चालवत असल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केला आहे, त्यानंतर काँग्रेसने असा आरोप केला की जोश इराणींच्या तथाकथित रेस्टॉरंट सिली सोलमध्ये गोमांस आणि डुकराचे मांसही मिळते. तर दुसरीकडे स्मृती इराणी म्हणाल्या की त्यांची मुलगी अवघी 18 वर्षांची आहे आणि ती महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे, तिचा रेस्टॉरंट आणि बारशी काहीही संबंध नाही.

आता या आरोपांविरोधात इराणी यांनी आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना नोटिसाही पाठवल्या आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर हॉटेलवर झालेल्या कथित आरोपांचा मुद्दा अधिक पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोव्यात गोमांसावर बंदी नसली तरी काँग्रेसचे नेते हा मुद्दा उपस्थित करत आहेत. हॉटेलचा एक कथित मेनू सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, ज्यामध्ये बीफ डिश सर्व्ह करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. यावरून राज्यातही काँग्रेसच्या महिला नेत्यांकडून आंदोलनं करण्यात आली आहेत.

केंद्रीयमंत्री स्मृती इराणींच्या विरोधात पुण्यात आज काँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. स्मृती इराणी यांच्या मुलीचा गोव्यात बार असून त्या बारमध्ये बीफ ठेवण्यात आलंय, मात्र माझी मुलगी 18 वर्षांची आहे आणि ती कॉलेज करतेय असं सांगून स्मृती इराणी या खोटं बोलत आहेत, असा आरोप काँग्रेसच्या महिला आघाडीने केलाय, यामुळे स्मृती इराणी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलीय.

“शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीज दर प्रति युनिट एक रुपयांनी स्वस्त”

टायगर श्रॉफ-दिशा पटानीचं ब्रेकअप, तब्बल ६ वर्षांनी संपवल नातं

Team Global News Marathi: