अमली पदार्थांच्या आडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव- मुख्यमंत्री ठाकरे

 

राज्यात अमली पदार्थाच्या मुद्द्यावरून राजकारण तापत असताना सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केली आहे. यावर आता खुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत विरोधकांना टोला लगावला आहे.

जगभरातील अमली पदार्थ जणू काही महाराष्ट्रातच तयार होत आहेत आणि ते पकडण्याची कामगिरी फक्त विशेष चमूच पार पाडू शकते, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या ख्यातीला बदनाम करण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला डावलण्याचा प्रयत्न होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, असे प्रतिपादन केले.

महाराष्ट्र पोलीस दल मजबूत आहे, गुन्हेगारांना येथे दयामाया दाखवली जात नाही तर त्याला शिक्षेपर्यंत पोहोचवले जाते. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. २५ कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ पकडणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक व्हायलाच हवे, असेही त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आवर्जून सांगितले.

नागपूर येथे जलदगती डीएनए तपासणी व वन्यजीव तपासणी प्रयोगशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होऊन महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. महाराष्ट्रात अमली पदार्थवरून तापलेल्या वातावरणावरही त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केले.

Team Global News Marathi: