देवेंद्र फडणवीसांसह नारायण राणे, प्रवीण दरेकर यांचा कोकण दौरा, घेणार अपघातग्रस्तांची भेट !

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही कोकणच्या भेटीला पोहोचत आहेत. त्यांच्यासोबत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे आणि विधपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर सुद्धा सोबत आहे. राज्यातील पूरदुर्घटनेत आत्तापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल दिड लाखांच्यावर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाड येथील दरड कोसळलेल्या घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी, तेथील नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यांना धीर दिला. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगत पुनर्वसन करण्याचं आश्वासनही दिलं. त्यानंतर, मुख्यमंत्री आजच चिपळूण दौऱ्यावर आहेत. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही कोकणच्या भेटीला पोहोचत आहेत.

कोकणच्या पूरपाहणी दौऱ्यासाठी फडणवीस यांनी मुंबईतून प्रस्थान केलं आहे. यासंदर्भात स्वत: फडणवीस आणि नारायण राणे यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे.

 

Team Global News Marathi: