शीख व्यक्तीला तुम्हा पगडी काढायला सांगाल का? – अबू आझमी

 

मुंबई | हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. न्यायालयाने मुलींची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने म्हटले की, हिजाब हा धर्माचा अत्यावश्यक भाग नाही. विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये गणवेश घालण्यास नकार देता येणार नाही. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे.

इस्लाममध्ये हिजाब घालणे अनिवार्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यावर पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून मुस्लीम समाजासोबत अन्याय होत आहे असे म्हटले आहे.

ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आहे मात्र मला हा निर्णय चुकीचा वाटत आहे.देशात अनेक धर्माचे लोक राहतात प्रत्येक धर्माची एक प्रथा परंपरा आहे. तसेच कोण काय घालणार आणि काय खाणार हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते आता शीख धर्मियांसाठी पगडी आणि तलवार त्यांच्या समाजात अनिवार्य आहे आणि त्यांना कोणी थांबवू शकत नाही. शीख व्यक्तीला तुम्हा पगडी काढायला सांगाल का? तेव्हा तुम्ही काय बोलत नाहीत.’ असेही ते म्हणाले.

Team Global News Marathi: