“सिद्धूने तर काम चोख केल, आता नाना मागे राहून कस चालेल?” केशव उपाध्ये यांचा टोला

 

पंजाब सोडून इतर राज्यात भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच पंजाबमध्ये आप ची जादू बघायला मिळाली. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाने एकहाती विजय मिळवत ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळवला.

तसेच विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, पंजाब काँग्रेस अध्‍यक्ष नवज्योत सिंह सिद्धू अशा दिग्गजांना पराभव पत्कारावा लागला. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता भाजप नेते केशव उपाध्येयांनी पंजाब काँग्रेस अध्‍यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांची तुलना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी केली आहे.

यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’पंजाब काँग्रेस अध्‍यक्ष नवज्योत सिंह सिद्धू आणि आपले महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात बरच साम्य आहे. दोघेही बाहेरून काँग्रेसमध्ये गेलेले, तसेच दोघेही राहुल गांधींचे खास, दोघांनाही नुसत्या गावगप्पा करायची सवय. सिद्धूने तर काम चोख केल, आता नाना मागे राहून कस चालेल?’, अशी खोचक टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

Team Global News Marathi: