पुणे | राज्यात महिलांवरील अत्यचाऱ्यांच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दिवसेंदिवस आलेख वाढत चालला आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आठ नराधमांनी एका विधवा महिलेवर बलात्कारकेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सदर आरोपींनी पीडित महिलेला विविध ठिकाणी घेऊन जात तिला नरक यातना दिल्या आहेत. तब्बल सात महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. माऊली पवार, रज्जाक पठाण, काळू वाळुंज, विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पू गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज, नवनाथ वाळुंज अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. सदर महिला विधवा असून स्वभावाने थोडीशी भोळसर आहे.