धक्कादायक: देशात सलग चौथ्या दिवशी सापडले 60 हजारावर रुग्ण; एकूण आकडा 22 लाखांच्या पुढे

विशेष ट्रेन्स सुरूच राहणार | एक्स्प्रेस, मेल तसंच लोकलबाबत निर्णय नाही

नवी दिल्ली, १० ऑगस्ट : भारतात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं समोर येत आहे. सलग चौथ्या दिवशीही 60 हजारहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाख 15 हजार 075 वर पोहोचली आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 1,007 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 6 लाख 15 हजार 945 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहे. तर 15 लाख 35 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 44, 386 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जगभरातील कोरोना आकडेवारीचा विचार करता अमेरिका आणि ब्राझिलनंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात सर्वाधिक कोरोनाची संख्या महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात आहे.

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लोकल, मेल आणि एक्स्प्रेस सेवा सुरु अथवा बंदच ठेवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. मात्र विशेष ट्रेन्स सुरूच राहणार असल्याचं देखील प्रशासनाने स्पष्ट केलं आहे

ग्लोबल न्युज नेटवर्क: