शरद पवारांच्या आवाहनाला सांगलीच्या ‘या साखर कारखान्याचा प्रतिसाद; उभारणार 100 खाटांचे कोविड रुग्णालय

महाराष्टातील साखर कारखाना दार यांनी कोविड हॉस्पिटल उभारले पाहिजेत असे आवाहन खास शरद पवार साहेबांनी केले होते त्याला प्रतिसाद देऊन सांगलीतील वसंतदादा कारखान्याकडून १०० खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव : विशाल पाटील

The Vasantdada Shetkari Sahakari Sakhar Karkhana (Vasantdada Farmers Co-operative Sugar Factory) Limited in Sangli ; Maharashtra ; India

सांगली : मा शरद पवार सो. यांनी केलेल्या आवाहनानुसार वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यामार्फत, १०० खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली.

कारखाना कार्यस्थळावर असलेल्या जागेवर तातडीने हे हॉस्पिटल उभा करण्याची आमची तयारी आहे.कोरोनाचे संकट अत्यंत मोठे आहे. शासनाच्या यंत्रणेला कोरोनाशी लढताना काही मर्यादा येत आहेत. यासाठी मा शरद पवार सो. यांनी राज्यातील साखर कारखान्यांना आवाहन करुन तातडीने कोविड हॉस्पीटल उभा करण्यास सांगितले आहे. वसंतदादांचे कुटुंबिय नेहमीच जनतेच्या हितासाठी अग्रेसर राहिले आहेत. कारखान्याच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे यापूर्वी झालेले आहेत.

कोरोना काळात पहिल्या टप्प्यातच वसंतदादा कारखान्याने सॅनिटायझरचे उत्पादन करुन ते अनेक गावांमध्ये मोफत वाटप केले होते. नंतर ते अल्पदरात नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले. आयसोलेशन व कॉरंटाईनसाठी वसंतदादा कारखान्याची जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती. आता सांगली जिल्ह्यात तसेच सांगली महापालिका क्षेत्रात वाढणारा कोरोना संसर्ग लक्षात घेऊन कारखाना कार्यस्थळावर तातडीने शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल उभा करण्याची आमची तयारी आहे.

यासाठी आम्ही महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना तसा प्रस्ताव दिला आहे. तर सभासदांच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडेही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी जागेची पाहणी केलेली आहे. शासनामार्फत हे रुग्णालय चालवावे किंवा त्यांची अडचण असल्यास आम्हीही हे रुग्णालय चालविण्याची तयारी दर्शविली आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासहीत हे कोविड रुग्णालय करण्याचा आमचा प्रस्ताव असून तो तातडीने मंजूर केल्यास रुग्णांची चांगली सोय होईल, असा विश्‍वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: