धक्कादायक : एअर इंडियाचा प्रत्येकी सहाच्या मागे एक कर्मचारी कोरोना बाधित

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्याच पाश्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबई मनपा खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ती खबरदारी घेत आहे. त्यात एअर इंडियाचा प्रत्येक सहावा कर्मचारी हा कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. तर एकूण १९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे.

सध्या मुंबई पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मुंबईत जानेवारी महिन्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली होती . दिवसाला सरासरी ३०० ते ३५० रुग्णवाढ होत होती. पण आता हा आकडा ६५० पर्यंत पोहोचला आहे. मुंबईत लोकल सर्वांसाठी सुरु केल्यानंतर १५ दिवसांनी निरीक्षणांचा कालावधी आहे. २१ फेब्रुवारीला संपत असल्याने २२ फेब्रवारीला महापालिका आढावा घेणार आहे.
त्यातच कोरोनाच्या रुग्ण संख्येत विदर्भात झपाट्याने वाढ होत आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ या शहराचा समावेश आहे.

अकोल्यात गेल्या आठवडाभरात पाचशेच्या वर रुग्ण आढळून आली होती. त्यामुळे अकोलेकरांची चिंता वाढली आहे.कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी काही नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे.

Team Global News Marathi: