शाळा उघडताच पंजाबमध्ये २ कर्मचारी आणि १५ विध्यार्थी कोरोना बाधित

देशभरात कोरोनाच्या पाश्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशभरातील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आल्या. त्यात काही महिन्यानंतर कोरोना रुग्ण कमी होत असतानाच हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत महाराष्ट्र सोडून इतर राज्यात शाळा-कॉलेज सुरु करण्यात आल्या होत्या.

एकीकडे देशभरात लसीकरण सुरु झालेले असताना दुसरीकडे मात्र पंजाबमधून एक धक्कदायक माहिती समोर येत आहे. पंजाबमध्ये करोना काळानंतर शाळा सुरू होताच १५ विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत २ कर्मचारी देखील करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घावा लागला आहे.

गेल्या वर्षी २३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच करोनाच्या भितीमुळे लॉकडाऊन लागू केला होता. तेव्हापासून देशातल्या सर्वच भागातल्या शाळा बंद होत्या. त्यानंतर तब्बल ८ महिन्यांनी करोनावर प्रभावी ठरेल अशी सिरम इन्स्टिट्युटची व्हॅक्सिन बाजारात आली. हळूहळू लॉकडाऊनकडून अनलॉकचा प्रवास देखील सुरू झाला होता.

Team Global News Marathi: