शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी

 

मुंबई | राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना पक्षाकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. पक्षाने दिलेल्या निर्देश आणि आदेशानुसार मतदान करण्याचे शिवसेना आमदारांना सांगण्यात आलं आहे. 10 जून रोजी मतदानात सहभागी होण्यासाठी विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात सकाळी आठ वाजता हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

येत्या 10 जून रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह सर्वच पक्ष खबरदारी घेत आहेत. त्यानुसारच शिवसेना आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. आमदार फुटू नये म्हणून खबरदारी म्हणून त्यांना हॉटेलवर ठेवलं आहे. मतदानाच्या दिवशी शिवसेना कार्यालयात सकाळी आठ वाजता हजर राहण्यास सांगितलं आहे.

राज्यसभा निवडणुकीचे मतदान शुक्रवार दिनांक 10 जून 2022 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला, विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभआ सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून सदस्यांनी शुक्रवारी दिनांक 10 जून 2022 रोजी शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय, दुसरा मजला, कक्ष 214, विधानभवन, मुंबई या दालनात मतदानाबाबतच्या सूचना घेण्याकरता सकाळी 8 वाजता उपस्थित राहावे.

तसेच आपल्याला देण्यात येणाऱ्या निर्देश आणि सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करायचे आहे. अत: शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांना कळवण्यात येते की, सदस्यांनी उपरोक्त दिवशी वेळेवर उपस्थित राहून पक्षाने दिलेल्या आदेशानुसार मतदान करावे, अशा पक्षादेश आहे.

Team Global News Marathi: