शिवसेनेचे आमदार हॉटेलमध्ये जाताच भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन लागले कामाला ?

 

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने छोटे पक्ष तसेच अपक्षांच्या मताला मोठी किंमत आलेली आहे. तीन आमदारांचे पाठबळ असलेल्या बहुजन विकास आघाडीला यात विशेष महत्त्व आले असून, महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाकडूनकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे हितेंद्र ठाकूर यांनी जो आमच्या भागाचा विकास करणार त्यांचा मत देणार असे ठणकावून सांगितले आहे.

भाजपाच्या नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. मग शिवसेनेच्या शिष्टमंडळाने देखील हितेंद्र ठाकूर यांची विरारमध्ये जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता पुन्हा संकटमोचक म्हणून ओळख असणारे भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची रात्री भेट घेतली. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची पालघरमध्ये पकड आहे.

सध्या त्यांच्याकडे तीन आमदार आहेत. त्यामुळे भाजपाचे संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनीही हितेंद्र ठाकूर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेत, राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याचे सांगण्यात येत आहे. गिरीश महाजन यांनी याआधीही भाजपच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या मुंबईतील आमदारांची जबाबदारी प्रामुख्याने शेलार आणि लाड सांभाळत आहेत.

महाराष्ट्रात सध्या राज्यसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. सर्वच पक्षांच्या हालचालींना या निवडणुकीमुळे वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत येऊन राहण्याचे आदेश दिले आहेत. तर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडत आहे. यंदा अपक्षांच्या मतांवर सर्व गणित अवलंबून असल्याने मोठ्या पक्षांकडून त्यांची मनधरणी करण्याचं काम सुरू आहे.

Team Global News Marathi: