‘भाजपला हरवायचंय?, खुलेपणाने मदत मागा’ ओवेसी यांचं आघाडीला आवाहन

 

राज्यसभा निवडणुकीसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्वच आमदारांची मते खूप महत्त्वाची आहेत. यामुळे लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचा भाव चांगलाच वाढला आहे. त्याच दरम्यान एमआयएमकडून एक मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी महाविकास आघाडीने अद्याप मतदानासाठी संपर्क साधलेला नाहीये, पण एमआयएमची गरज असेल तर संपर्क साधावा असं म्हणत मविआ उमेदवारांना मतदान करण्याचे संकेत दिले आहेत.

असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं, “राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकासाठी कुणीही आमच्याशी संपर्क केलेला नाहीये. तसेच आमच्या आमदारासोबत संपर्कही केलेला नाहीये. त्यामुळे आम्ही पाहू… जर महाविकास आघाडीला मतांची आवश्यकता आहे तर त्यांनी एमआयएमसोबत संपर्क साधावा.

जर आवश्यकता नसेल तर काही हरकत नाही. आम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ.” राज्यसभेबाबत महाविकास आघाडीने अजून आमच्या सोबत किंवा आमच्या आमदारांशी संपर्क केला नाही . त्यांना जर एमआयएमची गरज असेल तर महाविकास आघाडीने संपर्क करावा अशी प्रतिक्रिया एमआयएमचे अध्यक्ष असद ओवेसी यांनी दिली. अर्थात महाविकास आघाडीने संपर्क केला तर एमआयएम राज्यसभेसाठी त्यांना मतदान करणार असल्याचे ओवेसी म्हणाले.

त्यांनी जर संपर्क केला नाही तर आम्ही आमचा निर्णय घेऊ असं ओवैसी म्हणाले. एमआयएम ची मते कुणाच्या पारड्यात? राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासंदर्भात निर्णय आज पक्ष अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी घेणार आहेत. आज एमआयएमच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणीची बैठक नांदेडमध्ये होणार आहे.

Team Global News Marathi: