‘शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही’; दीपाली सय्यद यांच सूचक ट्विट

 

मुंबई | शिवसेनेने विधान परिषदेला आपल्या अपक्ष आमदारांची मते काँग्रेसकडे वळविली होती. असे असले तरी काँग्रेसचा उमेदवार पडला होता. यामुळे काँग्रेस आमदारांत नाराजी असल्याचे वारे सुरु असताना अचानक शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदेंनीच बंड पुकारल्याने मोठी खळबळ उडाली आहे तर दुसरकीकडे शिवसेना नेत्या दिली सय्यद यांनी सूचक ट्विट केले आहे.

राज्यात घडणाऱ्या या घडामोडींवर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दीपाली सय्यद ट्विट करत म्हणाल्या की, एकनाथ शिंदे भाजपात जाणार हे म्हणणाऱ्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे.. उगाच भाजपाच्या IT Cellच्या लिंबू टिंबुनी सोशल मीडियावर तर्क-वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही, असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत आज दिल्लीसाठी रवाना होणार होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी संजय राऊत दिल्लीला जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र राज्यातील या घडामोडी बघता संजय राऊतांनी दिल्ली दौरा रद्द केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील तातडीची बैठक बोलावल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत एकनाथ शिंदेंची नाराजी कशी दूर करता येईल, महाविकास आघाडी सरकार कसं वाचवता येईल, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: