शिवसेनेत अंतर्गत कलह चव्हाट्यावर, सेनेची एकूण १२ मतं फुटली

 

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं. आधी राज्यसभेच्या आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडी सरकार तोंडघशी पडलं आणि भाजपला मोठा विजय मिळवून दिला. विधान परीषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजय झाले आहे.

तसंच शिवसनेनेचे 3 आमदार आणि 9 समर्थक अपक्ष आमदारही फुटले आहेत. अशातच या निकालाचे तीव्र पडसाद काल मध्यरात्री पासूनच शिवसेनेच्या वर्तुळात उमटायला सुरुवात झाली आहे. आज दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची तात्काळ बैठक बोलवली आहे. या बैठकीत पराभवावर सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

मात्र त्या आधीच सोमवारी रात्रभर वर्षा बंगल्यावर बैठकांचं सत्र एका पाठोपाठ सुरू होतं. शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक शिवसेना आमदारांसोबत बैठका पार पडल्याचं समोर येत आहे. विधान परीषद निवडणुकीत शिवसेनेला त्यांच्या आमदारांचीही काही मतं मिळाली नाहीत, त्यामुळे शिवसेनेत अंतर्गत सर्वकाही ठीक नाही, हे दिसून आलं आहे. याचे मोठे राजिकीय परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आजचा दिवस शिवसेनेसाठी महत्वाचा आहे.

Team Global News Marathi: