काँग्रेसचा दलित उमेदवार हा पराभूत झाला हे दुर्दैवी

 

राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत सर्वांत मोठा धक्का काँग्रेसला बसला.

या निवडणुकीत काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले तर दलित नेते म्हणून परिचित असलेले चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. खरे पाहता काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे सेफ उमेदवार मानले जात होते. यावर आता काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी प्रतिक्रिया देत थेट महाविकास आघाईड्वर निशाणा साधला होता. काँग्रेसचा दलित उमेदवार हा पराभूत झाला हे दुर्दैवी असल्याचे म्हटलं आहे.

दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. याचे कारण आधीच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे. सरकारवर त्यांच्याच आमदारांचा विश्वास नाही. त्यामुळे आमचा पाचवा उमेदवार हा निवडणू येईल. आणि झाले ही तसेच. या विधान परिषदेत शेवटच्या क्षणी भाजपचे प्रसाद लाड चांगल्या मतांनी विजयी झाले. तर काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्कारावा लागला.

या निवडणुकीत आघाडीची २१ मतं फुटल्याचे समोर आले. तर हे फक्त महाविकास आघाडीतला अंतर्गत रोष बाहेर पडल्याचेच दर्शवणारे होते. त्यामुळे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत आपली खदखद मांडली. ते म्हणाले, दलित उमेदवार चंद्रकांत हंडोरे ज्यांना काँग्रेस आमदारांच्या पहिल्या पसंतीची मते मिळायची होती. ते काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराकडून पराभूत झाले हे खरोखरच दुर्दैवी आहे. ही अंतर्गत दुफळी आहे.

Team Global News Marathi: