शिवसेना नेते संजय राऊतांच्या जामीनावर आज फैसला, जेल की बेल आज होणार फैसला ?

 

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी होणार असून आज न्यायालय आपला फैसला सुनावणार आहे.

दरम्यान, तपासयंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं केला आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत न्यायालय काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी 9 नोव्हेंबरला कोर्ट निर्णय देणार आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील मागील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी पार पडली होती. यावेळी राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीनं आपलं लेखी उत्तर न्यायालयात सादर केलं. त्यानंतर न्यायालयानं जामीनावरील आपला निकाल राखून ठेवला होता. आज यावर सुनावणी होणार असून न्यायालय निकाल देणार आहे. मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत आणि प्रविण राऊत दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज एकाच दिवशी निकाल देण्यात येणार आहे.

 

 

Team Global News Marathi: