शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात, यासारखे दुर्देव काय?

 

आमदार नंतर खासदार आणि आता पदाधिकारी हे शिंदे गटात सहभागी होत असताना या गटाने थेट शिवसेना पक्षावरच दावा केला आहे. यासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरु असून दोन्ही गटांना 8 ऑगस्टपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, शिवसेना कुणाची हे ठरवण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात यासारखे दुसरे दुर्देव काय? असा सवाल खा. संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

तसेच ही वेळ केवळ बंडखोरांमुळे आली असून महाराष्ट्रातील 11 कोटी जनता हे सर्व उघड्या डोळ्याने पाहत आहे. या गटाचा वापर करुन शिवसेना फोडण्याचे काम हे भाजप करीत असल्याचा आरोपही संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. मात्र, ज्या पक्षामुळे सर्वकाही मिळाले त्याच पक्षातील बंडखोरांमुळे ही वेळ आल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

शिवसेना कुणाची हे 11 कोटी जनतेला माहिती आहे. सीमाप्रश्नासाठी मेलेले 69 हुतात्मे हे सेनेचेच, हजारो आंदोलनातून शिवसैनिक शहिद झाला, तुरुंगात गेला हा पुरावा आहे… 1992 च्या दंगलीत हजारो शिवसैनिकांवर खटले दाखल झाले, लोक मारले गेले हा पुरावा आहे. मराठी माणसाच्या रक्तामध्ये शिवसेना आहे हा पुरावा… पक्षातून 10 ते 20 लोक फोडले ते देखील पैसे आणि दहशतीने हा पुरावा होऊ शकत नसल्याचे राऊतांनी सांगितले आहे.

शिवसेना हा केवळ एक पक्ष नाहीतर महाराष्ट्राची अस्मिता आहे. केवळ स्वार्थासाठी आणि पक्ष फोडण्यासाठी राजकारण हे खालच्या पातळीवर गेले आहे. ज्यांनी अस्मितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे अशा बंडखोरांना जनता कधीच माफ करणार नसल्याचे राऊतांनी सांगितले आहे.

मराठी भाषेतील पाट्यांबाबत सुप्रीम कोर्टाची राज्य सरकार तसेच मुंबई मनपाला नोटिस

आम्हांला हिणवले तर आणखी स्फोट होतील; शंभूराज देसाईंचा ठाकरे पिता-पुत्राला इशारा

Team Global News Marathi: