शिवसेना खासदार संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर आणखी एक आरोप

 

मुंबई | काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपा नेते किरीटी सोज्य्य यांच्यात वाद होत असल्याचे चित्र दिसून येत असून आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी ट्विट करून सोमय्यांवर निशाणा साधला आहे. ‘किरीट सोमय्या यांनी ज्या कंपनीवर आरोप केले होते, त्याच कंपनीने सोमय्यांच्या संस्थेला कोट्यवधींची देणगी दिली,’ असा आरोप राऊत यांनी केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या ठाकरे सरकारमधील विशेषत: शिवसेनेच्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यास सुरुवात केली. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्यांनी जवलेल्या निधीत अपहार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यानंतर आता ‘आप क्रोनोलॉजी समजिए’ म्हणत संजय राऊत यांनी सोमय्या आणि ईडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

संजय राऊत यांनी आज सोमय्यांविरोधात दोन ट्वीट केले आहेत. संजय राऊत म्हणतात की, ”२०१३-१४ मध्ये किरीट सोमय्या यांनी एका कंपनीविरोधात आरोप केले होते. 2016 मध्ये कंपनीच्या प्रमुखाची ईडीने चौकशीदेखील केली. त्यानंतर २०१८-१९ मध्ये सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला याच कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. आप क्रोनोलॉजी समजिए. मी तक्रार दाखल करणार,” असे राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: