“शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिलीय”

 

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांची संप पुकारला आहे. तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने या प्रकरणी न्यायालयीन अवमानाबाबत एसटीच्या आंदोलन करणाऱ्या युनियनला नोटीस बजावली आहे. मात्र, भाजप एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत असून, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी भावनिक बोलून एसटी कर्मचारी यांचा प्रश्न सुटणार नाही. अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली आहे, राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांवर जुलमी स्वरुपाची कारवाई सुरू आहे. एसटी बंद करुन खाजगी बसेस सुरु करत आहेत. यातून काही मलिदा लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे का? एका बाजूला एसटी बंद ठेवायची आणि दुसरीकडे खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन द्यायचे, हे चुकीचे आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

तसेच अनिल परब यांच्या टीकेला उत्तर देताना दरेकर म्हणाले की, भाजपला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कुणाची पोळी भाजण्याची गरज नाही. कोणतीही इच्छा असेल तर सर्व काही करता येईल. महाराष्ट्रातील एसटी महामंडळ हे देशातील सर्वात मोठे महामंडळ आहे. त्यात काही लिकेजस आहेत. ते व्यवस्थित केले तर सर्व काही व्यवस्थित करता येईल, असे दरेकर यांनी सांगितले.

Team Global News Marathi: