किमया शेअर बाजाराची ; नायकाची नायिका बनली देशातील सर्वात श्रीमंत महिला

किमया शेअर बाजाराची ; नायकाची नायिका बनली देशातील सर्वात श्रीमंत महिला

काही तासांतच संपत्ती 6 पट वाढून 49 हजार कोटी झाली, देशातील सर्वात श्रीमंत सेल्फमेड अब्जाधीश

 

ब्यूटी स्टार्टअप नायकाचा शेअर लिस्ट होताच 89% उसळला; फाल्गुनी म्हणाल्या, वयाच्या पन्नाशीत अनुभवाविना प्रारंभ केला.

ब्यूटी व फॅशन स्टार्टअप ‘नायका’ने बुधवारी शेअर बाजारात एंट्री करताच धूम उडवली. काही तासांतच बीएसईवर तिचा शेअर ८९.२४% उसळून २,१२९ रुपयांवर पोहोचला. ८१.७८ पट सबस्क्राइब झालेल्या तिच्या आयपीओची इश्यू प्राइस १,१२५ रु. होती.

परिणामी नायकाच्या संस्थापक आणि कंपनीमध्ये ५४% हिस्सेदारी असलेल्या फाल्गुनी नायर यांची संपत्ती एकाच दिवसात ६ पटींपर्यंत वाढून ६.५ अब्ज डॉलर्सवर (सुमारे ४९ हजार कोटी रुपये) गेली. यासोबतच त्या सावित्री जिंदल (१८ अब्ज डॉलर्स) आणि विनोद राय यांच्यानंतर (७.६ अब्ज डॉलर्स) देशातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत महिला बनल्या. तसेच त्यांनी देशातील सर्वात श्रीमंत महिला सेल्फमेड बिलियनेअरचाही बहुमान मिळवला.

फोर्ब्ज 100 च्या यादीत 7 वी भारतीय महिला…संपत्तीबाबत किरण मुजुमदार यांनाही मागे टाकले
1. सावित्री जिंदल 17.7 अब्ज डॉलर
2. विनोद राय गुप्ता 7.6 अब्ज डॉलर
3. लीना तिवारी 4.4 अब्ज डॉलर
4. दिव्या गोकुलनाथ 4.05 अब्ज डॉलर
5. किरण मुजुमदार शॉ 3.9 अब्ज डॉलर
6. मल्लिका श्रीनिवासन 2.89 अब्ज डॉलर

मंजिल से कहीं जरूरी है सफर…मुलीकडून ऐकलेल्या या कवितेने आयुष्य बदलले

आयआयएम ते एमबीए… कोटक महिंद्रात २० वर्षे नोकरीनंतर २०१२ मध्ये सुरू केले ब्यूटी स्टार्टअप {नायकाचे ५५ लाख मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. कंपनीची ७५ पेक्षा जास्त प्रत्यक्ष दुकाने आहेत. १२०० पेक्षा जास्त ब्रँड्सची ७ लाखांपेक्षा जास्त उत्पादने नायकाच्या प्लॅटफॉमवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत.

नायका ही ब्यूटी रिटेल कंपनी ऑनलाइन व ऑफलाइन कॉस्मेटिक प्रॉडक्ट विकते. हिरोइनच्या संस्कृत शब्दापासून तिचे नाव घेतलेले आहे.

आता फोर्ब्ज १०० च्या सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत फाल्गुनी यांचे नाव. त्यांची संपत्ती ६.५ अब्ज डॉलर्स आहे.

शेअर लिस्टिंग सोहळ्यात फाल्गुनी आणि त्यांची कन्या अद्वेता यांच्यासोबत अभिनेत्री कॅटरिना कैफ हीदेखील उपस्थित होती. विशेष म्हणजे, कॅटरिना ही या कंपनीतील एक गुंतवणूकदारही आहे.

कन्या अद्वेताने फाल्गुनी यांना सी.व्ही. कवाफी यांची ‘इथाका’ कविता ऐकवली. त्यातून प्रेरित होत नोकरी सोडून २०१२ मध्ये स्टार्टअप सुरू केले.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: