तपास यंत्रणाचा आता पालिकेच्या शिपायांवर सुद्धा धाड टाकतील, संजय राऊतांच्या टोला

 

मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांनी आज शिवसेना नेते आणि मुंबई महानगर पालिकेचे स्थायी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी सकाळी धाड टाकली याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत केंद्रातील मोदी सरकारला टोला लगावला आहे. तपास यंत्रणा उद्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या घरावर धाड टाकू शकतात, अशी उपरोधिक टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

आज, सकाळी मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या भायखळा येथील निवासस्थानी आयकर विभागाने आज धाड टाकली. या धाडीवर टीका करताना संजय राऊत यांनी टीका केली. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असल्याने अशा प्रकारच्या कारवाया होत असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे या कारवाई होत आहेत. उद्या मुंबई महापालिकेच्या शिपयाच्या घरी धाड टाकण्यासाठी तपास यंत्रणा जातील असेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड या भाजपेत्तर राज्यांना 2024 पर्यंत तपास यंत्रणांचा त्रास सहन करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. २०२४ नंतर पुढे पाहून घेऊ असेही राऊत यांनी म्हटले.

Team Global News Marathi: