शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत आक्षेपार्ह वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांचा माफीनामा

 

भारतीय जनता पक्षाचे नेते नेते प्रसाद लाड यांनी भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला गेला. त्यानंतर प्रसाद लाड यांनी यावर भाष्य करत दिलगिरी व्यक्त केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुणाच्याही भावना दुखावल्या असतील ; तर त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागतो.” असे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना जुने आदर्श तर नितीन गडकरी हे नवीन आदर्श असल्याचे ते म्हणाले. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली, असे म्हटले होते. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना शिंदे गटाच्या बंडखोरीशी केली.

तर दुसरीकडे , आमदार प्रसाद लाड यांनी संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. तसेच त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली. त्यामुळे प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Team Global News Marathi: