सध्या राज्यात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्यामुळे महाराष्ट्र सरकारने इतर राज्याकडून ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासंदर्भात प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र आत याच मुद्द्यावरून मध्यप्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारने ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्या-राज्यांमध्ये वाद पेटलेले दिसून येत आहे.
कोरोनासंदर्भात चर्चेसाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत असं सांगण्यात आलं, की मध्य प्रदेशने महाराष्ट्रातील निर्माता कंपन्यांकडे ऑक्सिन कॉन्सनट्रेटरची ऑर्डर दिली होती, मात्र राज्य सरकारने टाकलेल्या दबावामुळे ती ऑर्डर पाठवण्यात आली नाही. सरकारचा असा आरोप आहे, की महाराष्ट्र सरकार मध्य प्रदेशात कॉन्सनट्रेटर न पाठवण्यासाठी दबाव टाकत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशात सध्या २००० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर आले आहेत, तर ६५० कॉन्सनट्रेटर अजून येणार आहेत. 1300 कॉन्सनट्रेटर जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी केले आहेत. मात्र, सरकार महाराष्ट्राकडूनच कॉन्सनट्रेटर विकत घेत आहे. अशात आता महाराष्ट्रातून ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मिळणे आता कठीण झाले आहे. मात्र याच मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या यामुळे महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.