शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा, त्यांचा जन्म. संभाजी बीड गुरुजींचे आणखी एक वादग्रस्त विधान

 

सतत वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणारे संभाजी भिडे हे आता पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण त्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर खळबळजनक वक्तव्य केले आहे.शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा. शिवछत्रपतींचा जन्म हा शिवनेरीवर झाला. त्याचा जन्म हिंदू पंचांगाच्या तिथीनुसारच झाला पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.

पुण्यातील जुन्नरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे विधान केले आहे. यावेळी बोलताना भिंडेनी,”आमची राज्य सरकारला विनंती आहे. शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा. शिवछत्रपतींचा जन्म हा शिवनेरीवर झाला. त्याचा जन्म हिंदू पंचांगाच्या तिथीनुसारच झाला पाहिजे, असे त्यांनी या कार्यक्रमादरम्यान म्हटले. तसेच आज त्यांचे नको इतके पुतळे उभारले जात आहेत.

अरबी समुद्रात त्यांचे स्मारक होणार आहे. या समुद्रातील स्मारकाचा आणि शिवछत्रपतींच्या आयुष्याचा काहीही संबंध नाही. या स्मारकावर कोट्यवधी रुपये खर्च होणार आहे. सरकारने हे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नये”, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी, “शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर हिंदू स्वराज्य स्थापन झालं आणि ‘शिवशक’ सुरू झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि देशाच्या पंतप्रधानांनी हे लक्षात घ्यावं, ही स्वाभिमान ठासून भरलेला असा हा ‘शिवशक’ आहे. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावर तो पोहोचला पाहिजे”, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे

Team Global News Marathi: