शिवभोजन थाळी खाताना दहा वेळा विचार करा कारण की,

 

यवतमाळ | राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभजनाची संकल्पन मांडली होती अखेर ठाकरे सरकारने सत्तेत आल्यानंतर ‘शिवभोजन’ योजना सुरू केली. या योजने अंतर्गत संपूर्ण राज्यभरात गरीब जनतेला स्वस्त दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन दिली जात आहे.

मात्र, याच शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची फज्जा उडाल्याचे भयाण वास्तव समोर आलं आहे. या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जाते ती जेवण झाल्यावर नंतर चक्क शौचालयातील पाण्याने धुतल्या जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. त्यामुळे एकच टीका होताना दिसून येत आहे.

हा किळसवाणा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे आणि शिवभोजन केंद्रातील अन्न आणि तेथील स्वच्छतेचा प्रश्न समोर आला आहे. विशेष म्हणजे हे शिवभोजन थाळी केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलेचे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारच्या हेतूला हरताळ फसल्या जात आहे. अशा प्रकारे भांडी धुवून त्याच थाळीत पुन्हा भोजन देत असल्याने एक प्रकारे गरिबांची थट्टाच उडविल्या जात आहे.

Team Global News Marathi: